‘काऊ हग डे’चा जी आर काढणारा ‘दिवटा’, अजित पवार यांचा निशाणा नेमका कुणावर?
गाय लाथ घालेन मग निघेल काऊ हग डे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा खोचक टोला
लातूर : व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी ऐवजी गायीला मिठी मारा केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने हा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आदेशही काढले होते. या आदेशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस असतो, पण केंद्राने परिपत्रक काढून तो दिवस काऊ हग डे असल्याचे सांगितले. मी पण शेतकरी कुटुंबातील आहे, गाईला आपण गोंजारले आहे पण गाईला मिठी कधी मारली नाही. दिल्लीत बसतात आणि काहीतरी आदेश काढतात. काय हग डे, त्यांना म्हणावं ये एकदा काऊ समोर मग निघेल काऊ हग डे…एक लाथ मारली की इकडे-तिकडे जाईल फरफटत असे म्हणत त्यांनी मिश्कील प्रतिक्रीया दिली आहे.
Published on: Feb 11, 2023 07:31 AM