Shiv Sena आणि NCP आमदार प्रकरणावर एकाच दिवशी होणार सुनावणी, काय आहे कारण?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पुढची तारीख देण्यात आली आहे.
नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांबाबत अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचेही दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. दरम्यान या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासंदर्भात अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीवर भाष्य केलं. शिवसेना आणि NCP आमदार प्रकरण क्लॅप केलं आहे. या याचिकांवर एकत्र यावर सुनावणी होणार आहे. १३ ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. ती सुनावणी आधी पुढच्या महिन्यात होणार होती पण ती सुनावणी आधीच होणार आहे. आता सुनील प्रभू आणि जयंत पाटील या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. या दिवशी सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्देश १३ तारखेला देऊ शकतं. ठाकरे गटाच्या याचिकेवर ३ नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती १३ ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.