Special Report | 2019 लाच भाजपचा सेनेला संपवण्याचा बेत? शरद पवार यांच्या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट?

Special Report | 2019 लाच भाजपचा सेनेला संपवण्याचा बेत? शरद पवार यांच्या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट?

| Updated on: May 01, 2023 | 8:31 AM

VIDEO | 2019 साली भाजप आणि शिवसेनेतील अंतर का वाढलं? शिवसेना-भाजप युती का तुटली? शरद पवारांच्या पुस्तकात काय केला मोठा दावा?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन २ मे रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या आत्मचरित्रातून मोठे दावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये शहरी भागात शिवसेनेची ताकद कमी करून स्वबळ मिळवायचं हाच भाजपचा हिशेब होता असा दावा शरद पवार यांनी केला. तर शिवसेना भाजप युती का तुटली या दाव्यानं एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. २०१९ मध्येच शिवसेनेला शहरातून हद्दपार करणार असा भाजपचा हिशेब, शरद पवारांच्या पुस्तकातून नेमका काय केला दावा? पहाटेच्या शपथविधीमागे नेमकं कोण होतं? याबाबत खुलासा होणार का? याबद्दलही उत्सुकता… शिवसेना सध्या दोन गटात विभागली गेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये नवीन समीकरण महाराष्ट्र बघत असताना शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील दाव्याची चर्चा आता सुरू झालीये. शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अंतर का वाढलं? याचं कारण देत असतानाच महाविकास आघाडीच्या जन्माची कथाही शरद पवार यांनी पुस्तकात मांडली आहे. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 01, 2023 08:31 AM