मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

| Updated on: Jun 07, 2023 | 11:38 AM

VIDEO | जाणीवपूर्वक भेदभाव सुरू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तेढ निर्माण होतील अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर यावेळी त्यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत मोठं वक्तव्य केले आहे. दरम्यान, देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटावी अशी स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. तर व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणं चुकीचं आहे. यासह काही जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले झाले. चर्च आणि ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय असतो. काही तक्रार असेल तर पोलिसांना सांगितली पाहिजे. पण म्हणून चर्चेवर हल्ला करण्याची गरज काय आहे? या मागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा सामाजाच्या हिताची नाही, असा आरोप त्यांनी केला.

Published on: Jun 07, 2023 11:15 AM