सुमित बाबाचा कॉल गेला की काम होतं; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
आता ठाण्यात एक नवा सुमित नावाचा बाबा तयार झालाय. या बाबाचा फोन ठाणे पोलीस आयुक्त असो पालिका आयुक्त असो यांना गेला की लगेच कामं होतात असा टोला लगावला आहे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर संताप व्यक्त करत कोण आहे हा धीरेंद्र बाबा असा सवाल केला आहे. मागील काही दिवसांपुर्वी आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी टीका केली होती. त्यानंतर आता ठाण्यात एक नवा सुमित नावाचा बाबा तयार झालाय अशी टीका केली आहे. तसेच या बाबाचा फोन ठाणे पोलीस आयुक्त असो पालिका आयुक्त असो यांना गेला की लगेच कामं होतात असा टोला लगावला आहे. तर ठाण्यात कोणता रंग लावयाचा हे देखिल हा सुमित बाबाच सांगतो असेही आव्हाड म्हणालेत. त्याचबरोबर हिरानंदानी येथे राहणाऱ्या या बाबाला 6 बेडरूमचा फ्लॅट अचानक कसा मिळाला. तर कोण आहे हा. मला पण या बाबाचा आशीर्वाद हवा आहे, असं ही आव्हाड म्हणाले.
Published on: Mar 24, 2023 07:48 AM
Latest Videos