‘तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?, ‘शिरसाट अन् आव्हाडांमध्ये खडाजंगी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर काय घडलं?
शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे संजय शिरसाट आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात विधानभवनाच्या पायऱ्यांवरच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून सभागृहात विविध मुद्यांवर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आलेत. यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांसह समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आज विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले होते. हीच प्रत त्यांनी रईस शेख आणि शिरसाट यांच्या हातात दिली. संविधानाची प्रत दाखवून मुसलमानांचा त्यावर विश्वास नाही असं दाखवायचं आहे का तुम्हाला? असं सवाल संजय शिरसाट यांनी केला. इतकंच नाहीतर जाणूनबुजून तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता? असाही प्रश्न शिरसाटांनी यावेळी केला. यावर आव्हाड म्हणाले, आम्ही घटनेबरोबरच आहोत, आम्हाला या देशात ठेवा ना, आम्हाला मारण्यासाठी का टपलात तुम्ही? औरंगजेब हा औरंगजेब आहे. तो मुसलमानांचा नातेवाई नाही. औरंगजेबासाठी यांना का त्रास देताय. बघा शिरसाट, आव्हाड आणि रईस शेख यांच्यात नेमकं काय झालं?

हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला

खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा

‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
