‘लढेगा साला…मरेगा नहीं’, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना काय दिला नेमका इशारा
VIDEO | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर संतापले केलं ट्विट आणि म्हणाले...
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर पुन्हा एकदा ट्विट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी ठाण्यातील पोलिसांना लक्ष्य करत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच ठाण्यात घडलेल्या रोशनी शिंदे प्रकरणावरून गेल्या काही दिवसांतील घडलेल्या घटनांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. ‘ठाणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तंग करण्यासाठी वापरण्यात येतं आहे. नवी मुंबईत अनु आंग्रे तर ठाण्यात विक्रम खामकर, हेमंत वाणी, अभिजीत पवार, विशांत गायकवाड या सगळ्यांना तडीपार करण्याच्या कारवाईला देखिल सुरुवात झाली आहे. मला देखिल येन-केन प्रकारे गुंतवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तुम्हांला 10-15 वर्षे शिक्षा होईल. तुम्ही कशाला स्वतःचा जीव अडचणीत आणताय. तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचे नाव सांगून टाका. सर्व साक्षीदारांना ज्यांनी 3 वर्षापूर्वीच साक्ष दिली आहे.ज्यांची चार्जशीट देखिल कोर्टात गेलेली आहे त्या सर्व आरोपीना जे 3 वर्षांपूर्वीचा आरोपी झालेले आहेत आणि ज्यांची चार्जशीट देखिल कोर्टात गेलेली आहे. त्यांना घाबरवण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत.’, असे त्यांनी या ट्विट द्वारे म्हटले आहे.