‘अजित पवार हे राज्यातलं सक्षम नेतृत्व’, ‘या’ भाजप नेत्यानं व्यक्त केला विश्वास
'अजित पवार हे राज्यातलं सक्षम नेतृत्व', 'या' भाजप नेत्यानं व्यक्त केला विश्वास
जळगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष पद निर्माण केले असून शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागली आहे. मात्र सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केल्यानंतर अजित पवार यांना डावलल्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राजकीय वर्तुळातून एकच चर्चा रंगल्या होत्या. तर या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे अजित पवार देखील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्या नाराजीवर भाष्य केले आणि त्यांच्यावर सक्षम नेतृत्व असल्याचे म्हणत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे सर्वात सक्षम नेतृत्व आहे. राष्ट्रवादीमध्ये जे आहेत त्यांच्यापेक्षा अजित दादा हे सरस होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना डावललं गेलं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद असल्याचे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन म्हणाले.