16 MLAs Disqualified | शिवसेनेच्या ‘त्या’ १६ आमदारांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
VIDEO | शिवसेनेचे १६ आमदार अपात्र झाले तरी..., सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानतंर अजित पवार यांनी काय केलं वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांवरही (16 MLAs Disqualified) भाष्य केले. अजित पवार म्हणाले, 288 पैकी 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. पण निकाल वेगळा लागणारच नाही. पण लागला तरी बहुमतावर कोणताही परिणाम होणार नाही. 288 मधून 16 गेले तरी त्याचे 272 राहताय. त्यामुळे त्यांचं बहुमत असल्याने त्यांचे सरकार कायम राहील, अशी स्पष्टपणे प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली तर असं सांगतानाच कोर्टाने व्यवस्थित निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्ष 16 जणांचा निर्णय घेईल. यापूर्वीही विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घेतलेला आहे, असंही ते म्हणाले. तर जागा वाटपासाठी प्रत्येक पक्षाकडून नावे येणार आहेत. पण जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी एका पक्षाचे साधारण दोन सदस्य असावेत असं ठरलं. म्हणजे एकूण सहा नेते एकत्र बसून लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांची चर्चा करतील असं ठरलं. तीन पक्ष नाही तर त्यांच्याशी संबंधित जे मित्र पक्ष आहेत, त्यांची आमदार संख्या कमी असेल, पण त्यांना मानणारा वर्ग आहे. मतदार आहे. त्या पक्षांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.