संजय राऊत यांच्या खालच्या पातळीवरील ‘त्या’ टीकेवर अजित पवार यांची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO | खालच्या पातळीवरील केलेल्या संजय राऊत यांच्या टीकेवर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
नाशिक : संजय राऊत यांना माध्यमांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर प्रश्न विचारला असता त्यांच्यावर बोलण्यापूर्वी संजय राऊत थुंकल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरून राजकीय वर्तुळात थुकण्यावरून नवा वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राऊतांच्या या कृतीवर भाष्य करताना म्हटले की, सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे. तर यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत’, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या सल्ल्यावर प्रत्युत्तर दिले. मात्र अजित पवार यांनी पुन्हा संजय राऊत यांना सल्ला दिला आणि त्यांनी दोन शब्दात नो कमेंट म्हणत यावर आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, ‘संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.’