दादांना कोकणात धक्का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं घेतली ठाकरेंची ‘मशाल’ हाती
विधासभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.
विधासनभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी आपली कंबर कसली आहे. कुठे कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याच्या बैठका सुरू आहेत तर कुठे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग अन् आऊट गोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळतंय अशातच कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीा मोठा धक्का बसल्याची माहिती मिळतेय. राजापूर लांजा मतदारसंघातील अजित यशवंतराव यांनी राष्ट्रवादीला राम राम करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर अजित यशवंतराव हे दाखल होत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेत शिवबंधन बांधले आहे. अजित यशवंतराव हे रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत. अजित यशवंतराव यांनी मंगळवारी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी तसेच पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.