‘घरामध्ये गाढव पाळणारे सदावर्ते काय खातात हे तपासलं पाहिजे’

| Updated on: Jun 13, 2023 | 8:42 AM

VIDEO | '...तर रस्त्यावर उतरावेच लागेल',गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

अकोला : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या फोटोशेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे. सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नथुराम गोडसे यांच्यावर न्याय झाला नव्हता, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल करताना मिटकरी म्हणाले, सदावर्तेच्या आडून गांधी हत्येचे उघड समर्थन आणि नथुराम गोडसेचा जयजयकार आजपासून महाराष्ट्रात उघडपणे सुरू झालाय! अगोदर औरंगजेब, आता गोडसेच्या माध्यमातून भाजपाने हिंसेची भूमिका उघडपणे सुरू केली आहे. आम्हालाही महाराष्ट्रात मानवतावादी विचारधारा घेऊन रस्त्यावर उतरावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तर गुणरत्न सदावर्ते हा घरामध्ये गधे पाळतो.तर गुणरत्न सदावर्ते काय खातो हे सर्वात पहिले तपासले पाहिजे असा घणघाती आरोप शरद पवारांवर बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Published on: Jun 13, 2023 08:42 AM
शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? अंबादास दानवे म्हणतात, “जैसी करनी वैसी भरनी”
Special Report | एकनाथ शिंदे यांच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार, कोण आहेत ‘ते’ चार मंत्री?