'...तर तुमच्या हस्ते वारकरी शासकीय पूजा होऊ देणार नाही', कुणी दिला इशारा?

‘…तर तुमच्या हस्ते वारकरी शासकीय पूजा होऊ देणार नाही’, कुणी दिला इशारा?

| Updated on: Jun 12, 2023 | 5:12 PM

VIDEO | 'वारीच्या वैभवशाली परंपरेवर हात उचलणाऱ्या सरकारने स्वतःच्या कारकिर्दीवरच लावला काळा डाग'

मुंबई : वारकऱ्यांवर इंग्रजांप्रमाणे लाठी हल्ला करण्यात आला ही बाब अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली. तर हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारणारे आता दिसत नाही, असे म्हणत नितेश राणे तसेच तुषार भोसले यांच्यावर नाव न घेता अमोल मिटकरी यांनी टीका केली. तर घडल्या प्रकाराबाबत जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना विठुरायाची शासकीय पूजा करू देणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला. पुढे ते असेही म्हणाले की, वारकरी संप्रदायावर पोलिसीबळाचा वापर केल्यानेही घटना घडली. नियोजनाचा अभाव आणि केलेल्या नियोजनातील गलथान कारभारामुळे ही गोष्ट घडल्याच समजत आहे. वारीच्या वैभवशाली परंपरेवर हात उचलणाऱ्या या नाकर्त्या सरकारने स्वतःच्या कारकिर्दीवरच हा काळा डाग लावून घेतला आहे. मी या घटनेचा त्रिवार निषेध करतो, असे मिटकरी म्हणाले आणि हल्लाबोल केला.

Published on: Jun 12, 2023 05:12 PM