चौकशीच्या फेऱ्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना अटक, पाहा व्हीडिओ
आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Ncp Leader And Minister Nawab Malik) यांना ईडीकडून (Ed) अटक करण्यात आली आहे.नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर (Ekbal Kaskar) यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना […]
आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Ncp Leader And Minister Nawab Malik) यांना ईडीकडून (Ed) अटक करण्यात आली आहे.नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर (Ekbal Kaskar) यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर (Nawab Malik Arrested) त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.