‘धमकी देणाऱ्यांचा ब्रेन शोधून काढा’, छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल
VIDEO | 'शरद पवार यांना धमकी येणं निषेधार्ह' म्हणत छगन भुजबळ यांनी काय केली मागणी?
नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना जीवे मारण्याची ही धमकी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि राऊत बंधू यांना धमकी देणं ही अतिशय संतापजनक आणि काळजीची गोष्ट आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे तसेच पलीकडे राज्यात लंकेश, कलबुर्गी या सगळ्यांचे मनूवृत्तीच्या लोकांनी जीव घेतले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारत सरकार काय किंवा महाराष्ट्र सरकार काय , कोणीच या ( हत्यांच्या) मुळाशी जात नाहीत. आणि या सगळ्यांचा जीव घेणारे कोण आहेत, याचा इतकी वर्ष उलटूनही त्यांचा शोध लागत नाही, काहीही कारवाई होत नाही. सरकार काय करतंय , असा सवाल भुजबळ यांनी केला. हे सगळ शोधून काढलं, मुळाशी गेलं तर हे सर्व संपेल’, असेही ते म्हणाले. तर या धमकीला पवार साहेब किंवा राऊत बंधू भीक घालणार नाहीत, असेही भुजबळ यांनी सांगितले.