पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर धनंजय मुंडे यांचा सल्ला, म्हणाले, ”विचार करून बोललं”
याचदरम्यान त्यांना आपल्या पक्षात यावं अशा पायघड्या इतर पक्षांकडून घातल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांनी दिल्लीतच मी भाजपची आहे. भाजप माझा थोडीच आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता राजकिय चर्चा होताना दिसत आहे.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यामुळे त्या भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान त्यांना आपल्या पक्षात यावं अशा पायघड्या इतर पक्षांकडून घातल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांनी दिल्लीतच मी भाजपची आहे. भाजप माझा थोडीच आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता राजकिय चर्चा होताना दिसत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या नाराजी नाट्यावरून पंकजा यांना सल्ला दिला आहे. त्यांनी भाजप हा आता बदलला पक्ष आहे. भाजपचं नेतृत्व बदललं आहे. भाजपमध्ये नव्याने लोक आलेत त्यामुळे भाजप आज समुद्र आहे. पंकजा ही माझी बहीण आहे. अशा परिस्थिती कुठं काय बोलावं? त्या बोलण्यानं नुकसान तर होणार नाही ना? याचा विचार करून तिने बोललं पाहिजे. या गोष्टी बोलताना, थोडी सबुरी घेतली पाहिजे, असं मुंडे यांनी म्हटलेलं आहे.