'महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा', एकनाथ खडसे यांची मोठी मागणी, नेमकं कारण काय?

‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी, नेमकं कारण काय?

| Updated on: May 20, 2023 | 7:56 AM

VIDEO | महाराष्ट्रातून खान्देश वेगळं करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी का केली मागणी?

जळगाव : जळगाव जिल्हा आणि खान्देशातील मंजूर झालेले अनेक विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यांनी ‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, अशी मागणीही केली आहे. एकनाथ खडसे यांनी खान्देशासाठी मंजूर झालेले पण नंतर इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झालेल्या प्रकल्पांची यादी सांगत खान्देशावर अन्याय होत असल्याची भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली. याच रागापोटी त्यांनी वेगळ्या खान्देशाची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांना परवानगी मिळाली आहे. काही प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत. काही कालखंडात ते मंजुरीपर्यंत पोहोचून गेले आहेत. पण गेल्या 10 वर्षात असं लक्षात आलं की, या प्रकल्पांना वेग तर आला नाहीच, पण इथले प्रकल्प बाहेर जिल्ह्यामध्ये हलवण्याचा प्रयत्न होतोय, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे.

Published on: May 20, 2023 07:56 AM