‘…तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीत’, नेत्यांचा वाद थेट कपडे काढेपर्यंत; एकनाथ खडसे यांचा वार काय?

| Updated on: Aug 10, 2023 | 10:12 PM

VIDEO | जिल्ह्यातल्याच नेत्यांचा वाद थेट कपडे काढेपर्यंत; एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १० ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. खडसे यांची विश्वासार्हता काय? अशी टीका केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी बोचरा वार केलाय. गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आक्रमक होत शाब्दिक टीकेतून महाजन यांचे कपडेच काढले. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. ‘भाजप – शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. त्यावेळी गिरीश महाजन यांचा कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्या कालखंडातील दिल्लीच्या कोर कमिटीच्या बैठकीला महाजन यांना बोलावल्या जात नव्हतं. त्यावेळी भाजपची सूत्र मी विरोधी पक्षनेते असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या, असं सांगतानाच कमीत कमी माहिती घेऊन त्यांनी बोलायला हवं’, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे. यावर पलटवार करत खडसे यांची विश्वासार्हता काय असा सवाल करत त्यांचं कोण ऐकणार असं म्हणत खोचक सवाल केलाय.

Published on: Aug 10, 2023 10:12 PM