निवडणूक आयोगातील सुनावरणीवरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘… हे ऐकून डोळ्यात पाणी आलं’
VIDEO | निवडणूक आयोगातील आजच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत खंत व्यक्त केली आहे. 'एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले.', असे आव्हाड म्हणाले.
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | निवडणूक आयोगातील आजच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत खंत व्यक्त केली आहे. शरद पवार यांना स्वत: निवडणूक आयोगामध्ये जाताना बघितलं. दुपारी 4 वाजता सुनावणी सुरु झाली संध्याकाळी 6 वाजता संपली. ते स्वत: तिथे बसून होते. त्यावेळेस त्यांच्या कानावरही शब्द आले, आमच्या कानावरही शब्द आले. समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. की, ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले तर पुढे ते असेही म्हणाले की, ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच शरद पवार यांच्याबद्दल अशी निवेदनं वकिलामार्फत करायला लावणं हे दुर्देवं आहे, असे म्हणत खंत व्यक्त केली.