Money Laundering Case : नवाब मलिक यांना १ वर्ष ५ महिन्यानंतर अखेर जामीन, काय आहे कारण?
VIDEO | nawab malik money laundering case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर, काय आहे कारण?
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
