राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना शिवडी कोर्टाकडून दिलासा, काय आहे प्रकरण?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून नियमित जामीन मंजूर, मोहित कंबोज यांच्या बदनामी प्रकरणात २ लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ | मोहित कंबोज यांच्या बदनामी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. २ लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नवाब मलिक यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र नवाब मलिक यांनी कोर्टात याप्रकरणी हजेरी लावल्यानंतर कोर्टाकडून त्यांचा वॉरंट रद्द करण्यात आला आहे. नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर मोहित कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. २०१२ पासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे. नवाब मलिक यांच्याकडून मोहित कंबोज यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपावंर नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. त्यातून दिलासा मिळावा यासाठी मलिकांनी शिवडी कोर्टात अर्ज केला होता. याप्रकरणी त्यांनी दिलासा मिळाला आहे.