नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन, पण विरोधकांना वेगळीच शंका, बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Aug 12, 2023 | 10:18 PM

VIDEO | नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनावरून विरोधकांनाच वेगळी शंका तर 'मलिक अजितदादांसोबत आले तर भाजपला चालेल?', कुणी उपस्थित केला सवाल, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर झाला. मात्र नवाब मलिक यांच्या जामिनावरून विरोधकांकडून वेगळीच शंका उपस्थित करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्या आरोपांमुळे मंत्री असताना नवाब मलिक जेलमध्ये गेले होते. मात्र आता १५ महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. या जामिनाबरोबर आता मलिक शरद पवार गटात जाणार की अजित पवार गटात जाणार यावर चर्चा सुरू असताना मलिकांच्या जामीनावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका उपस्थित केलीये. काही विशिष्ट राजकीय भूमिकेच्या बदल्यात जामीन मिळाला असावा, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर मलिकांना जामीन मिळाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा अजित पवार गटानं जल्लोष केला. त्यानंतर शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी फटाके फोडले. मात्र जशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली तशीच शंका विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली…बघा काय म्हणाले विजय वड्डेटीवार….

Published on: Aug 12, 2023 10:18 PM
सत्तेत आल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक, या गुप्त भेटीवर नाना पटोले म्हणतात…
मुंबईतील ‘मंगळागौर’ कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची हजेरी, बघा कोणतं गायलं सुरेल गाणं?