नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी दिली भावाच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती, म्हणाले…
VIDEO | मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाकडून 2 महिन्यांचा जामीन मंजूर, मलिक यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे बंधू कप्तान मलिक यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | गेल्या दोन दिवसांपूर्वी मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. या जामीनानंतर सोमवारी नवाब मलिक तुरूंगाबाहेर आले. दरम्यान, मलिकांना मिळालेल्या दिलासा नंतर नवाब मलिक यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे बंधू कप्तान मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितलं आहे असं कप्तान मलिक म्हणाले. “आज स्वातंत्र्य दिन आहे, तिकडे देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तर दुसरीकडे माझ्या भावाला स्वातंत्र्य मिळून एक दिवस झालेला आहे. दिवाळी साजरी करतोय. आनंदाच उत्साहाच वातावरण आहे. मिठाई वाटण्यात आली. दोन महिने का होईना भाऊ आमच्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे” असं कप्तान मलिक यांनी सांगितलं.

भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?

1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
