शरद पवारांच्या 'त्या' टीकेवरून सप्रिया सुळे यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेवरून सप्रिया सुळे यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Jun 06, 2023 | 9:17 AM

VIDEO | शरद पवार यांच्या एकेरी उल्लेखावरून सुप्रिया सुळे यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका करत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केलाय. गोपीचंद पडळकर यांनी अरे तुरेची भाषा करत पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकर टीका केली. गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी पवार का नाही आलेय़. असे म्हणत एकेरी उल्लेख केला. यावर राष्ट्रवादीचे खासदार नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘गोपीचंद पडळकर जे बोलले तो त्यांचा संस्कृतीचा भाग आहे. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांच्यासह माझ्या घरच्यांचे पवार कुटुंबीयांचे संस्कार आहेत. मी एक मराठी स्वाभिमानी मुलगी आहे. जिच्यावर मराठी संस्कार झाले आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या विषयावर बोलणं म्हणजे… माझ्यासारख्या व्यक्तीने तरी बोलू नये’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Jun 06, 2023 09:15 AM