'गुगलवर देवेंद्र फडणवीस सर्च केलं तर टरबूज ऑफ महाराष्ट्र येतं', कुणी उडवली उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली?

‘गुगलवर देवेंद्र फडणवीस सर्च केलं तर टरबूज ऑफ महाराष्ट्र येतं’, कुणी उडवली उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली?

| Updated on: Nov 04, 2023 | 1:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली असल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही गुगलवर देवेंद्र फडणवीस टाका त्याखाली टरबूज ऑफ महाराष्ट्र येतं तर टरबूज ऑफ महाराष्ट्र टाका त्याखाली देवेंद्र फडणवीस येतं, असं मी नाही म्हणत तर गुगल म्हणतंय.

जळगाव, ४ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली असल्याचे पाहायला मिळाले. आणीबाणी वेळी लोक जेवढे भडकले होते, त्यापेक्षा जास्त लोक या सरकारविरुद्ध भडकले आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. तर तुम्ही गुगलवर देवेंद्र फडणवीस टाका त्याखाली टरबूज ऑफ महाराष्ट्र येतं तर टरबूज ऑफ महाराष्ट्र टाका त्याखाली देवेंद्र फडणवीस येतं, असं मी नाही म्हणत तर गुगल म्हणतंय, असं सांगत आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. एखाद्याला एखादी उपमा दिली तर ती जगभर पोहोचते हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे, असं सुद्धा म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

Published on: Nov 04, 2023 01:32 PM