ठाण्यात 'हम करे सो कायदा' अशी स्थिती अन् 'नवी मोगलाई आली', मुख्यमंत्र्यांवर कुणाचा निशाणा

ठाण्यात ‘हम करे सो कायदा’ अशी स्थिती अन् ‘नवी मोगलाई आली’, मुख्यमंत्र्यांवर कुणाचा निशाणा

| Updated on: Apr 04, 2023 | 8:18 PM

VIDEO | ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला

ठाणे : ठाण्यात हम करे सो कायदा अशी स्थिती आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेल्या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी हा निशाणा साधला आहे. काल ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. तर यावरूनच ठाण्यात नवी मोगलाई आली आहे. असा निशाणा जितेंद्र आव्हाड यांनी साधला होता. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत असे म्हटले की, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. शिंदे गटाच्या प्रवक्त्याने एका पत्रकाराला धमकी दिली; त्याबद्दल तीने कमेंट केली होती. शरद पवारांन ह्यांच्या बाबतीत वाईट लिहीत होता. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. तर शिंदे साहेबांनी ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत लावून धरली आणि आता सुद्धा पोलीस यंत्रणेचा वापर करून हेच सुरू आहे. हे म्हणजे ‘हम करे सो कायदा’ ही परिस्थिती आता ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नवीन मोगलाई आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 04, 2023 08:16 PM