‘लाज वाटते तुमची, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर कुणी ओळखतही नाही’, अजितदादांवर कुणाचा जोरदार हल्लाबोल?
लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, मला तर आधी पासूनच वाटायची.... शरद पवार हे बारामतीपुरते मर्यादित नाही तर देशातील मोठे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर ही कुणी ओळखत नाही, असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला.
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, मला तर आधी पासूनच वाटायची. शरद पावरांबाबत तुम्ही नेहमी काहीतरी मुद्दा काढून त्यांच्या उंचीची हवा काढून टाकायचे, ह्या सुपाऱ्या अजित पवार तुम्ही खूप वेळा वाजविल्या आहेत, असे वक्तव्य करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तर शरद पवार हे बारामतीपुरते मर्यादित नाही तर देशातील मोठे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर ही कुणी ओळखत नाही, असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला. तर शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे.आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वी पासून बघितलंय, कोणत्याच मिटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असच झालं पाहिजे म्हणायचे आणि तुमची नजर असायची भलतीकडे, अशी टीका आव्हाडांनी केली.