बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ, क्लिप व्हायरल, मात्र....बबनराव म्हणतात 'तो मी नव्हेच'

बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ, क्लिप व्हायरल, मात्र….बबनराव म्हणतात ‘तो मी नव्हेच’

| Updated on: Dec 15, 2023 | 11:36 AM

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या शिवीगाळचा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये ते राजेश टोपे यांना शिव्या देताना दिसताय. मात्र ही व्हायरल होणारी क्लीप, तो आवाज माझा नाहीच असे बबनराव लोणीकर म्हणाले.

मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या शिवीगाळचा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये ते राजेश टोपे यांना शिव्या देताना दिसताय. मात्र ही व्हायरल होणारी क्लीप, तो आवाज माझा नाहीच असे बबनराव लोणीकर म्हणाले. २०१४ च्या सरकारमध्ये स्वच्छता आणि पाणीपुरवठा असं खातं लोणीकरांकडे होतं. पण व्हायरल क्लिप ऐकल्यानंतर त्यांच्याकडे शिव्यांचा अजिबात तोटा नसल्याचे दिसतंय. नुकतीच जालना जिल्हा बँकेची निवडणूक झाली. इतर जिल्ह्यांप्रमाणे जालन्यात पॅनल टू पॅनल निवडणूक होत नाही. सर्वपक्षीय आपापल्या समर्थकांसाठी काही जागा बिनविरोध करतात. या व्हायरल क्लिपनुसार, राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकरांच्या मुलाला बँकेचा उपाध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता. मात्र भाजपच्या दानवेचे समर्थक भीमराव जावळेच उपाध्यक्ष व्हावे, ही दानवेंची इच्छा होती. पण दोघेही भाजपचे, पक्ष एक, जिल्हा एक पण दोघांचं काही जमेना… बघा नेमका वाद काय?

Published on: Dec 15, 2023 11:36 AM