रिर्टन गिफ्ट म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'अधिवेशनात नुसता टाईमपास झाला. सरकारने निर्णय करायला पाहिजे होता चहा बिस्कीटची पार्टी करायला पाहिजे होती. फिरायला जायला पाहिजे होतं. आठ ते दहा दिवसच अधिवेशन घेता मात्र चर्चा होत नाही सामान्य माणसाचे विषय मागेच राहतात हे योग्य नाही'
नागपूर, १० डिसेंबर २०२३ : दोन दिवसात अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भातील जनतेसाठी जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. अधिवेशनात नुसता टाईमपास झाला. सरकारने निर्णय करायला पाहिजे होता चहा बिस्कीटची पार्टी करायला पाहिजे होती. फिरायला जायला पाहिजे होतं. आठ ते दहा दिवसच अधिवेशन घेता मात्र चर्चा होत नाही सामान्य माणसाचे विषय मागेच राहतात हे योग्य नाही, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. तर नवाब मलिक यांच्यासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावर रोहित पवार यांनी भाष्य केले, ते म्हणाले, नवाब मलिकांवर जे काही आरोप झाले होते त्यानंतर ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले त्यांचं सकाळी स्वागत केलं दुपारी फडणवीस यांनी पत्र लिहिलं. मात्र माविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्या विरोधात जाऊन भाजपने अनेक वक्तव्य केली. नंतर त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून फडणवीस यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र मीडियामध्ये आलं. एकीकडे प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने धाड टाकून त्यांच्या अख्खी बिल्डिंगवर कारवाई केली होती ते तुम्हाला चालतात नवाब मलिक चालत नाही? असा सवालही केला. तर रिटर्न गिफ्ट म्हणून प्रफुल पटेल यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.