जॅकेटवर मागण्या आणि प्रश्नांची जंत्री, रोहित पवार यांच्या अनोख्या जॅकेटची अधिवेशनात चर्चा

जॅकेटवर मागण्या आणि प्रश्नांची जंत्री, रोहित पवार यांच्या अनोख्या जॅकेटची अधिवेशनात चर्चा

| Updated on: Dec 18, 2023 | 2:15 PM

शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटची जोरदार चर्चा विधानभवनात होताना दिसतेय. रोहित पवार यांनी एक जॅकेट घातलं असून त्यावर त्यांनी काही मागण्या लिहिल्या आहेत. नको पोकळ्या घोषणा 60, 000 शिक्षक भरती करा...

नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसताय, तर काही जण आपल्या मागण्या सरकारकडे करताना दिसताय. अशातच आज शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटची जोरदार चर्चा विधानभवनात होताना दिसतेय. रोहित पवार यांनी एक जॅकेट घातलं असून त्यावर त्यांनी काही मागण्या लिहिल्या आहेत. नको पोकळ्या घोषणा 60, 000 शिक्षक भरती करा, शिक्षण व कौशल विकास , समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ तर गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ अशा प्रकारे मागण्या अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्या जॅकेटवर लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. यासह शिक्षक भरती ही लवकर व्हावी 60 हजारापर्यंत पद भरावे.. प्राध्यापकांचे पदे रिक्त आहे ते भरावे, अशा मागण्या रोहित पवार यांनी अधिवेशनात केल्यात.

Published on: Dec 18, 2023 02:11 PM