सुप्रिया सुळे खाली वाकल्या अन् शरद पवार यांच्या…, बाप-लेकीचा व्हिडीओ tv9 च्या कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Sep 30, 2023 | 2:37 PM

VIDEO | शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील बाप-लेकीचं नातं आणि त्यातील जिव्हाळा पुन्हा एकदा आला समोर. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या पायात चप्पल घालतानाचा व्हिडीओ व्हायरल

लातूर, ३० सप्टेंबर २०२३ | लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या भूंकपाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहे. ३० सप्टेंबर १९९३ साली किल्लारी येथे मोठा भूंकप झाला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते. भूकंपाची घटना घडली तेव्हा शरद पवार यांनी ती परिस्थिती उत्तमरित्या हाताळली होती. त्यामुळे त्यांचं देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. दरम्यान आज लातुरात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा लातुरात होते. यासगळ्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील बाप-लेकीचं नातं आणि त्यातील जिव्हाळा पुन्हा एकदा समोर आला आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पायाशी बसून त्यांनी स्वतःच्या हाताने पवारांच्या पायात चप्पल घातली. यापूर्वी लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेवेळीही हेच चित्र पाहायला मिळालं होतं आणि तेच चित्र पुन्हा कॅमेऱ्यात कैद करण्यात आलंय.

Published on: Sep 30, 2023 02:31 PM
Ajit Pawar यांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य अंगलट येणार? शरद पवार गटानं उचललं कोणतं मोठं पाऊल?
निवडणूक आयोग भाजप खिशात घेऊन फिरते, कोणत्या नेत्यानं केला थेट आरोप?