Supriya Sule यांनी नाव न घेता कुणावर साधला निशाणा? म्हणाल्या, अदृश्य शक्तीकडून पक्ष, घर फोडण्याचं पाप
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या काल सोलापूर येथील कुर्डूवाडीत असताना त्यांनी एका मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यातील शिंदे सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर, ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यात असणारं सरकार आणि केंद्रात असणारं सरकार हे विरोधकांना संपवायला निघालं असून अदृश्य शक्ती आहे. यात डाऊट नाही. दिल्लीची ही अदृश्य शक्ती असून ही शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा देवेंद्र फडणवीस या तिघांविरोधात ही अदृश्य शक्ती कट कारस्थान असल्याचा दावा काल सुप्रिया सुळे यांनी केला होता. यानंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्याकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. अदृश्य शक्तीकडून पक्ष आणि घर फोडण्याचं पाप केले जात असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अदृश्य शक्तीकडून खच्चीकरणाचं काम सुरू आहे. मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अदृश्य शक्तीचं काम सुरू असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर टीका केली आहे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात असून ती महाराष्ट्राचा द्वेष करत असल्याचे म्हणत त्यांनी खोचक निशाणाही लगावला आहे.