Eknath Khadse : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंचं नाव? सूत्रांची माहिती

Eknath Khadse : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंचं नाव? सूत्रांची माहिती

| Updated on: Jun 07, 2022 | 11:06 AM

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची चर्चा देखील सध्या सुरू आहे.

मुंबईः  राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय. यामध्ये अनेक बड्या नेत्यांना पुन्हा संधी दिली जातेय तर अनेक तरुण मंडली देखील समोर येतायेत. राज्यात विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेलाही वेग आला आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची चर्चा देखील आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलंय.

Published on: Jun 07, 2022 11:06 AM