का होतायत दंगली? शिंदे सरकारवर शरद पवार गंभीर आरोप म्हणाले, ‘जनतेला याची किंमत…’
जाती- जातीमध्ये संघर्ष पेटला आहे. तर धुमसत रहावा यासाठी काम करणाऱ्या प्रवृत्तींच्यामागे सत्ताधाऱ्यांची शक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. हे देशाच्या आणि राज्याला घातक असल्याचं बोलले होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चारच दिवस आधी दंगलीवरून राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं होतं. तर त्यांनी, राज्यात जातीय दंगली घडत आहेत. जाती- जातीमध्ये संघर्ष पेटला आहे. तर धुमसत रहावा यासाठी काम करणाऱ्या प्रवृत्तींच्यामागे सत्ताधाऱ्यांची शक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. हे देशाच्या आणि राज्याला घातक असल्याचं बोलले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी दंगलीवरून मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी पुरोगामी आणि शांतता प्रिय असणाऱ्या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. येथे दंगली भडकावल्या जात आहेत. याला कारण सत्ताधारी पक्ष आहे. कारण जेथे जेथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही. त्या त्या ठिकाणी दंगली भडकल्या. त्यामुळे तेथे जाणीवपूर्वक दंगली भडकवल्या असा आरोप त्यांनी केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी, होणाऱ्या दंगलींमुळे जनतेला याची किंमत मोजावी लागते असेही म्हटलं आहे.