‘मविआ’संदर्भातील सर्वात मोठी बातमी, ‘मातोश्री’वरील बैठकीत ठाकरे गट अन् काँग्रेसचा प्लॅन बी तयार
VIDEO | राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, आगामी २०२४ च्या निवडणुकीसंदर्भात 'मातोश्री'वरील बैठकीत ठाकरे गट अन् काँग्रेसचा प्लॅन बी तयार, काय आहे महाविकासआघाडीचं नेमकं प्लॅनिंग?
मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांच्याशिवाय २०२४ ची निवडणूक लढायची ठाकरे-काँग्रेसचा प्लॅन-बी असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तर महाविकास आघाडीमधून शरद पवार यांना बाजूला सारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर आगामी लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणूकांसह स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका देखील शरद पवार यांच्या व्यतिरिक्त लढण्याची तयारी काँग्रेस आणि ठाकरे गटाने केली असल्याची माहिती आहे. तर याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर काँग्रेस-सेनेकडून प्लॅन बी तयार केला जात असून आघाडीत बिघाडी झालीच तर त्याप्रमाणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे.