Sharad Pawar : ‘त्यात काहीही चुकीचं…’, ठाकरे बंधूंची युती अन् पवार कुटुंबाचं मनोमिलन होणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांदरम्यान, कुठं बॅनरबाजीतून याचं स्वागत केलं जातंय तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार असल्याची चर्चा होतेय
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांदरम्यान शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर मोजकं बोलून आपलं मत मांडल्याचे पाहायला मिळाले. ‘ठाकरे बंधू एकत्र येणं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.’, असं स्पष्ट सांगत शरद पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित युतीसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे असेही म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत मला काही माहिती नाही. मी त्यांच्याशी बोललो नाही. त्यावर मी कसं भाष्य करू? असं म्हणत पत्रकारांनाच उलट सवाल केला असल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार आणि शरद पवारांच्या गेल्या १५ दिवसांत चार वेळा झालेल्या भेटीसंदर्भातही सवाल केला. यावर शरद पवार म्हणाले, जनतेच्या कामासाठी एकत्र आलो होतो. ऊस आणि उत्पादनवाढीसाठी आम्ही काम करतो. त्यात सरकार आलं पाहिजे ही आमची भूमिका होती. त्यामुळे सरकार प्रतिनिधीशी बोलणं त्यात काहीही चुकीची गोष्ट नसल्याचे स्पष्टच शरद पवार यांनी सांगितले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
