शरद पवार यांची नकार घंटा कायम; निवृत्तीवर ठाम; मग अध्यक्ष कोण?

शरद पवार यांची नकार घंटा कायम; निवृत्तीवर ठाम; मग अध्यक्ष कोण?

| Updated on: May 03, 2023 | 10:28 AM

पवार यांच्यावरील दबाव वाढला असून पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी दबावतंत्र वापरलं जात आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या बहुतेक जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पवार यांच्यावरील दबाव वाढला असून पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर राजीनामा परत न घेण्यावर पवार हे ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशीही जोरदार चर्चा रंगली आहे. याचदरम्यान अजितदादांऐवजी महिला नेत्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजित पवार ऐवजी सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता अधिक आहे. सुप्रिया सुळे या आज कर्नाटकातील निपाणी येथे प्रचाराला जात आहे. सुप्रिया सुळे कर्नाटकात प्रचाराला जात असल्याने त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार आहे. याशिवाय राज्यातील राजकीय पक्षाची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मानही सुप्रिया सुळे यांना जाणार आहे.

Published on: May 03, 2023 10:28 AM