Sharad Pawar Candidate List : शरद पवारांचे आणखी 5 उमेदवार मैदानात, पाचव्या यादीत कोणाला संधी?
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज पाचवी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणखी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. बघा आता कोणाला मिळाली संधी?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आणखी 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर 26 तारखेला 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी 7 उमेदवारांच्या नावांची चौथी यादी जाहीर केली होती. यानंतर आज आणखी 5 उमेदवारांच्या नावाची पाचवी यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शरद पवारांकडून माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुलुंड मधून संगीता वाजे, मोर्शी येथून गिरीश कराळे, पंढरपूर येथून अनिल सावंत आणि मोहोळ येथून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.