आता जोमानं तयारीला लागा, MPSC आयोगाच्या निर्णयानंतर काय म्हणाले शरद पवार?

आता जोमानं तयारीला लागा, MPSC आयोगाच्या निर्णयानंतर काय म्हणाले शरद पवार?

| Updated on: Feb 23, 2023 | 7:12 PM

VIDEO | MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ वर्षापासून लागू, विद्यार्थ्यांना प्रेरित करत नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

पुणे : एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राजकीय नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भेट घेतली होती. आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता शरद पवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Published on: Feb 23, 2023 07:10 PM