‘रूपाली चाकणकरांचा दौरा म्हणजे नौटंकी’, बदलापूर घटनेच्या तपासाचा आढावा अन् नंतर मेंहदी?

दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी रूपाली चाकणकर या बदलापूर येथे आल्यात. त्यानंतर त्या बदलापूर येथून उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात गेल्या. तिथे त्यांनी मेंहदीही काढली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काय केली रूपाली चाकणकर यांच्यावर टीका?

'रूपाली चाकणकरांचा दौरा म्हणजे नौटंकी', बदलापूर घटनेच्या तपासाचा आढावा अन् नंतर मेंहदी?
| Updated on: Aug 25, 2024 | 10:33 AM

बदलापूर घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापूर येथे आल्यात. मात्र तेथून निघाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात मेंहदी काढली. यावरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहेत. तर सिंधी कार्यक्रमात महिलांच्या आग्रहास्तव मेंहदी काढल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. मात्र नौंटकी अशी टीका करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांना संवेदनशीलता नसल्याचे म्हटलंय. बदलापूरहून निघताना मेहंदी लावण्यावरून रूपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. मला सिंधी समाजाच्या महिलांनी कार्यक्रमाला बोलावलं होतं. मात्र मी बदलापूरची घटना घडल्यामुळे पहिल्या दिवशी गेली नाही. महिलांच्या आग्रहामुळे मी कार्यक्रमला गेले होते आणि आग्रह असल्यामुळेच मी मेंहदी काढली, ती त्यांची परंपरा आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. तर सिंधी समाजाने २० दिवसांपूर्वीच रूपाली चाकणकरांना निमंत्रण दिलं होतं, असं सिंधी समाजाकडून सांगण्यात आलं.

Follow us
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर….
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप.
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन.
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी.
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.