‘अमोल मिटकरी ना नेता, ना त्याला कोणता अधिकार… त्यांनी तोंड बंद ठेवावं’, भाजप नेत्यानं फटकारलं
'राष्ट्रवादीने केवळ 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील. तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही.', असं अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. बघा काय म्हणाले दरेकर?
‘राष्ट्रवादीने केवळ 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील. तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही. महायुती आणि मविआ म्हणतात आम्ही 100 100 जागा लढू 288 मतदारसंघ आहेत.’, असं अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. कारण अमोल मिटकरी यांना अधिकार दिला आहे का? हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यानं जाहीर करावं. जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका ही अधिकृत असल्याचे समजू…, असं स्पष्ट मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मांडलं पुढे ते असेही म्हणाले की, अमोल मिटकरी यांच्या बोलण्याला महत्त्व द्यावं, असं मला बिल्कुल वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्याला महत्त्व येणार आहे. अमोल मिटकरींचं बोलणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं यापलिकडे दुसरा पर्याय नाही.