”छेडण्यासाठी, छळण्यासाठी आणि दबावासाठीच ईडीचा वापर सुरू”, राष्ट्रवादी नेत्याचा भाजपवर घणाघात
महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह राष्ट्रवादीचे नेत्यांकडून भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोदी सरकारवर टीका केलीये.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशीवरुन राज्यातील राजकारण हे चांगलचं तापलेलं आहे. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह राष्ट्रवादीचे नेत्यांकडून भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोदी सरकारवर टीका केलीये. जे विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना छळण्यासाठी तसंच विरोधकांवर दबाव आणण्यासाठी जाणीवपूर्वक ईडी सारख्या सरकारी यंत्रणाचा वापर केला जात आहे अशी टीका त्यांनी केलीये. तसेच जयंत पाटील यांनी वारंवार सांगितलं आहे की त्यांचा याच्याशी संबंध नाही. तरिही संबंध जोडला जात आहे. त्यांचा दुरानवे संबंध या प्रकरणाशी नाही. यावरून असं दिसतं जाणीवपूर्वक जे विरोधी पक्षांमध्ये आहे त्यांना ईडी, सीबीआयचा वापर करून छेडण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न सुरु आहे.