अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना विधानसभेचं मिळालं तिकीट
NCP ajit pawar Candidate 3rd List for Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. बघा कोणत्या ४ उमेदवारांनी मिळाली विधानसभेची संधी?
राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत 38 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. तर आज रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४९ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. सुनील तटकरे म्हणाले, आज आम्ही चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करत आहोत. त्यामध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडीत, फलटण मतदार संघातून सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेर मतदार संघातून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.