NCP Symbol Hearing | आयोगाच्या सुनावणीत नेमकं काय झालं? अजित पवार गट-शरद पवार गटाने काय केले दावे?
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून नेमके काय-काय दावे करण्यात आले? पुढील सुनावणीत कुणाच्या अडचणी वाढणार? बघा व्हिडीओ
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात राज्याचं लक्ष लागलेली सुनावणी पार पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान शरद पवार यांच्या गटाची भूमिका वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीमांडली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून वकील मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची 30 जूनलाच निवड करण्यात आलीय. याची माहिती निवडणूक आयोगाला 30 जूनलाच देण्यात आल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने केलाय. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. असेही अजित पवार गटानं म्हटलं. दरम्यान, विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे. पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केलाय. कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी विनंती शरद पवार गटानं केली