Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरूच... NIA चं थेट पथक संभाजीनगरात, कबरीला 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरूच… NIA चं थेट पथक संभाजीनगरात, कबरीला ‘पुरातत्व’चं संरक्षण अन्…

| Updated on: Mar 22, 2025 | 11:30 AM

औरंगजेबच्या कबर वरून सुरू झालेल्या वादानंतर झालेल्या हिंसाचारामुळे आता एनआयएची एन्ट्री यात झाली. संभाजीनगरमध्ये एनआयएच्या पथकाने पाहणी केली तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरातत्व विभागाने कबरच्या मागच्या बाजूला पत्र्याचा शेड लावलंय.

औरंगजेबाच्या कबरवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादंग सुरू आहे. ही कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनापासून सुरू झालेला प्रकार थेट हिंसाचार होईपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे यात आणखी कुठल्याच घटनेची भर पडू नये म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन ठेवले आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीडसह उदगीरमध्ये एनआयएच्या पथकांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनंतर नांगपुरात झालेल्या हिंसाचारात बांग्लादेशी कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी एनआयएन नागपूर पोलिसांकडून प्राथमिक माहिती गोळा केली आहे. आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे तर त्यापैकी काल कोर्टात हजर केलेल्या आठ पैकी चार जणांना 14 दिवसांची न्यायालयाने कोठडी आणि उर्वरित चार आरोपींना 23 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कबर हटवण्यासाठी फडणवीसांना पत्र लिहिण्याची गरज नाही राज्यात आणि केंद्रात त्यांचेच सरकार आहे. कुदळ, फावडे घेऊन जावं असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाइतकी पण औरंगजेब सरशी करू शकत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले. कबरवर खबरी सुरू आहेत. औरंग्यापेक्षा आम्हाला सरकारनेच जास्त मारल्याचं म्हणत कडूंनी निशाणा साधलाय.

Published on: Mar 22, 2025 11:30 AM