केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात मोठी अपडेट; आता जयेश पुजारीचा ताबा घेणार ‘ही’ तपास यंत्रणा
याप्रकरणात आधीच कर्नाटक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी उर्फ कांता याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत तो दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आणि खंडणीच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणात आधीच कर्नाटक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी उर्फ कांता याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत तो दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचं समोर आलं आहे. तर त्यानेच बेळगाव येथील कारागृहातून फोन करत गडकरींकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्यावर अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अॅक्ट (UAPA) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली होती. याचदरम्यान आता याप्रकरणात जयेश पुजारी उर्फ कांता याला NIAची टीम ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर याच्याआधी केलेल्या NIA च्या चौकशीत त्याचे कुख्यात दहशतवाद्यांशी संबंध होते हे समोर आले आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

