राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय
राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली प्रशासनाच्या वतीने कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील देशात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव हा कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन दिल्ली प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Latest Videos