Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरूड स्वतःला पाहिजे तशी झेप घेतो, शिंदे गटावर कुणाचा निशाणा?

गरूड स्वतःला पाहिजे तशी झेप घेतो, शिंदे गटावर कुणाचा निशाणा?

| Updated on: Sep 29, 2022 | 10:05 AM

गरूडाची आणि रेवण पक्ष्याची गोष्ट आहे. तो पक्षी सातत्याने त्याच्या मानेवर बसून त्रास देत असतो. पण गरूड त्याला पाहिजे तशी झेप घेतो. त्यामुळे शिवसेना आपल्या चालीने चालणार, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी  केलंय. 

सुनिल थिगळे, मुंबईः दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) कुणाची जास्त गर्दी जमते, यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना कामाला लागले आहेत. शिंदे गटातील आमदार आपापल्या भागातून शेकडो बस आणि हजारो कार्यकर्ते आणण्याचा दावा करत आहेत. पण शिवसेनेला फार प्रयत्न करून गर्दी जमवण्याची गरज नाही, असं वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलंय. बाळासाहेबांच्या सभेला हजारो-लाखोंच्या संख्येने शेतकरी मुलांना खांद्यावर घेऊन यायचे. त्यामुळे आमच्या सभांना जे काही कार्यकर्ते येतात,ते उत्स्फूर्तपणे येतात. गरूडाची आणि रेवण पक्ष्याची गोष्ट आहे. तो पक्षी सातत्याने त्याच्या मानेवर बसून त्रास देत असतो. पण गरूड त्याला पाहिजे तशी झेप घेतो. त्यामुळे शिवसेना आपल्या चालीने चालणार, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी  केलंय.

Published on: Sep 29, 2022 10:05 AM