औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार निलेश राणेंच्या वादग्रस्त ट्वीटनं नवा वाद

“औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” निलेश राणेंच्या वादग्रस्त ट्वीटनं नवा वाद

| Updated on: Jun 08, 2023 | 1:30 PM

या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्याबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर शरद पवार यांचं विधान चर्चेत आलं होतं. यावर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सिंधुदुर्ग : “या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्याबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर शरद पवार यांचं विधान चर्चेत आलं होतं. यावर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा?”, असं शरद पवार म्हणाले.दरम्यान, शरद पवारांचं विधान आणि त्यावरचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. तर निलेश राणे यांच्या ट्वीटवर ठाकरे गटाचे खासदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर हीच भाजपची नवी संस्कृती आहे का? असा सवाल त्यांनी केला.