‘संजय राऊत चपट्या पायाचे, जातात तिथे पक्षाचा पराभव होतो’, नितेश राणे यांचा टोला
'संजय राऊत घटनात्मक संस्थांवर सातत्याने टीका करतात. राज्य अस्थिर करण्याचा सातत्याने संजय राऊत प्रयत्न करतात.समांतर सरकार घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे'.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचं शुद्धीकरणाचा कार्यक्रम होईल. मी फडणवीस यांचे आभार मानतो.त्यांनी एसआयटी चौकशी लावली.त्र्यंबकेश्वर परिसरातील मटण-चिकनचे दुकानं बंद झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे’. ‘सातत्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा आरोप भाजपवर होतोय. पण 2004 मधल्या दंगलीबद्दल कोणी बोलत नाही आहे.दंगली घडविणारा कलानगरमध्ये बसला आहेत, त्या उद्धव ठाकरे यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. मातोश्रीवर जे कुलगुरू आहेत त्यांना बोलायला सांगा’. संजय राऊत घटनात्मक संस्थांवर सातत्याने टीका करतात. राज्य अस्थिर करण्याचा सातत्याने संजय राऊत प्रयत्न करतात.समांतर सरकार घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. ‘ज्या सत्यपाल मलिक यांनी देशाच्याविरोधात आवाज उठवला त्यांना जाऊन संजय राऊत भेटले. हे सर्व गुण अर्बन नक्षलचे आहेत’. याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले’. संजय राऊत चपट्या पायाचे आहेत,जातात तिथे पक्षाचा पराभव होतो. पोलिसांनी राऊतांच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे’, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.